नवरात्रीच्या पाककृतीचा
खरेच राजा असे फुलोरा,
एक वेळचा उपास असतो
शाबू-वड्याचा स्वाद खरा
आलूसह भिजलेला शाबू
शेंगादाण्या सह निघतो,
तेलामध्ये तळून निघता
सुंदर कुरकुरीत बनतो
घरच्या सुगरण हाताची चव
संगे घेवुन येता तो,
हरपून देह भान सारे
वाह वा करीत खातो तो
No comments:
Post a Comment