Saturday, October 13, 2018

नवरात्र ही सजली, रूपे अंबेची शोभली

नवरूपे नवरंगे नवरात्र ही सजली
नवरात्र ही सजली, रूपे अंबेची शोभली ।।धृ।।
निळ्या घोड्यावर बैसे,
पिवळा पितांबर कसे,
हिरवी चोळी अंगी विलसे,
रंगी रंगली, नवरात्र सजली ।।१।।
जांभळा चुडा हाती शोभे,
केशरी तांबूल मुखात साजे,
गुलाबी लाली गाली विलसे,
रूपे नटली, नवरात्र सजली ।।२।।
मयूरपंखासम फुलोरा,
साजतो शुभ्र शिरी गजरा,
नवरंगाचा गाभारा,
चमके बीजली, नवरात्र सजली ।।३।।

रचना :- चारुशीला पैंजणे

No comments:

Post a Comment