Friday, October 12, 2018

पन्हाळ्यातील दुर्गा उत्सव

असा हा पन्हाळा
आनंदात न्हाला
महालक्ष्मी लावी
जनासी जिव्हाळा

असे रौशनाई
तिथे मंदिरात
फुले दांडिया अन
भजन मंडपात

मिळण्या प्रसाद
घाईत बच्चे,
देवीच घडवी
संस्कार सच्चे

ऐशा आईचा
जयघोष व्हावा
आनंद मनीचा
कधी न सरावा

No comments:

Post a Comment