माझ्या जीवनात ज्या स्त्रीशक्ती चे अनन्य साधारण महत्व आहे, त्या माझ्या आई पासून पत्नी आणि पुतणी, भाच्यांपासून मुली पर्यंतचा उल्लेख करून त्यांचे महत्व दर्शविण्याचा छोटासा हा माझा प्रयत्न -
कृष्णाई जैसी मूर्ती वात्सल्याची
मम माय जशी की साय क्षिराच्यावरची
विद्या-प्रतिभा अन् रूप चारुचे ऐसें
वर्षाव करीतसे पुष्प-सरोजे जैसें
हेमा नि चंदना बंधूगृही परिमळे,
दीपा नित संगे सहजीवनास उजळे,
आसावरी आणिक दुजी अंकिता ऐसी,
गायनी आणखी नर्तनी रमवी जनासी
अभिरुपा दुसरे रूप स्वरा चे जैसे,
संगीत सुखाला नित नित फुलवी ऐसें
©मंगेश पैंजणे
दि. ११/१०/२०१८
No comments:
Post a Comment