Friday, March 9, 2018

होय आम्ही संघोटे

नाठाळाच्या माथी हाणू
साट सटासट सोटे,
बंधो आम्ही ते संघोटे
हो हो आम्हीच ते संघोटे

स्वयंप्रेरणेने झिजतो नित
जनउद्धारा साठी,
ना वागू, ना वागू देतो
कधी कुणाला खोटे

खोटी समता आम्हा न भावे,
मानवतेचे नाते,
सत्य सनातन दिव्य पताका
मनात नित्य फडकते