Saturday, October 13, 2018

कॅम्पेनिंग ऑफ मी टू

"मी टू" मे कूद पडा अब तो
है बबर शेर यूं सही सही,
चड्डी पकडे कहीं भाग न जाये
गब्बर सिंग की खैर नही

हाँ बीच रोड शो के मैं देखूँ
मुझमें है बातें कईं सही,
मुझको सहते हैं पार्टी के
दिगग्ज नेता ये यूहीं नही

हैं मुझे भूलने की आदत
घटनाएं ये सब कब थी घटी
जब लगे पता अपने काल मे
आँखे रह जाएं फटी फटी

आ के टपके ना कहीं कोई
महिला "मी टू" "मी टू" कहते,
हाँ वहीं थी मैं जब बबर शेर
महिला यूरीनल हो आये थे

नवरात्र ही सजली, रूपे अंबेची शोभली

नवरूपे नवरंगे नवरात्र ही सजली
नवरात्र ही सजली, रूपे अंबेची शोभली ।।धृ।।
निळ्या घोड्यावर बैसे,
पिवळा पितांबर कसे,
हिरवी चोळी अंगी विलसे,
रंगी रंगली, नवरात्र सजली ।।१।।
जांभळा चुडा हाती शोभे,
केशरी तांबूल मुखात साजे,
गुलाबी लाली गाली विलसे,
रूपे नटली, नवरात्र सजली ।।२।।
मयूरपंखासम फुलोरा,
साजतो शुभ्र शिरी गजरा,
नवरंगाचा गाभारा,
चमके बीजली, नवरात्र सजली ।।३।।

रचना :- चारुशीला पैंजणे

अंबामातेच्या वस्त्रांच्या रंग संगती चा अनव्यार्थ

वसने विभिन्न रंगांची ती
का करिते परिधान माऊली
आज पाहूया काव्यरूपातून
कशी प्रगटे जगदंब माऊली
निळा रंग दे शांती मनाला
पिवळा उल्हासित चित्ताला
हिरवा करि समृद्ध जीवना
समरस करी जांभळा भवाला
त्याग केशरी मनास शिकवी
शीत पांढरा शांती देई
लाल पाहता स्फुरण चढे ते
मोरपंखी आल्हादित सकला
रंग गुलाबी देई तरुणपण
कारज पूर्ण त्वरित करण्याला
अशी नवरूपे नवरंगातील
आशिष देती सदा भक्ताला
©मंगेश पैंजणे
दि. 12 ऑक्टोबर 2018
सहकार्य :- रुपाली सूर्यवंशी, कोल्हापूर

Friday, October 12, 2018

शाबूवडा

नवरात्रीच्या पाककृतीचा
खरेच राजा असे फुलोरा,
एक वेळचा उपास असतो
शाबू-वड्याचा स्वाद खरा

आलूसह भिजलेला शाबू
शेंगादाण्या सह निघतो,
तेलामध्ये तळून निघता
सुंदर कुरकुरीत बनतो

घरच्या सुगरण हाताची चव
संगे घेवुन येता तो,
हरपून देह भान सारे
वाह वा करीत खातो तो

आली आली ग भवानी, आली तुळजाभवानी

आली आली ग भवानी, आली तुळजाभवानी
सारे मुखाने गजर करू,
पूजा करून आईची, ओटी भरून खणाची,
चला उदो उदोकार करू ।।

सिंहवरी तू बैसून, अष्टआयुधे घेऊन,
दुष्टांचे निर्दालन, करी भक्तांचे रक्षण,
आली धावतची आली, करी कृपेची साऊली,
भक्तासाठी ही कल्पतरू
पूजा करून आईची, ओटी भरून खणाची,
चला उदो उदोकार करू ।।

राष्ट्राचे संरक्षण, करण्या झाली प्रसन्न,
शिवरायासी वरदान, दिली तलवार भवानीनं,
साधुसंतांना पावली, अशी माय माऊली,
चला भक्ती तिची करू
पूजा करून आईची, ओटी भरून खणाची,
चला उदो उदोकार करू ।।

रचना :- चारुशीला पैंजणे

नवरूपे तू धारण करूनी भक्ता तोषविसी

आश्विनात नवरात्र पर्वणी घेऊनिया येसी
नवरूपे तू धारण करूनी भक्ता तोषविसी ।।
।। जय अंबे, जगदंबे ।।

आदिशक्ती तू अंबाबाई, महालक्ष्मी ती तुळजमाई,
पंढरीस राय रखुमाई, तूच खरी येमाई ।।
।। जय अंबे, जगदंबे ।।

तूच कालिका तूच रेणुका, तू सर्वांची देवी अंबिका,
तूच चण्डिका हिंगुलांबीका, तू सर्वांची आई ।।
।। जय अंबे, जगदंबे ।।

रचना :- चारुशीला पैंजणे
दि. 11 ऑक्टोबर 2018
पन्हाळा, कोल्हापूर

देवीमाँ के पंडाल मे उत्साह

अंबा माता की सेवा में भक्तगण जमते हैं
मंडप में चैतन्य अनूप भर जाता है।

बैठती हैं पालकी मे माता रोज़ सायंकाल,
कंधेपे भगत उन्हे मंदिर घुमाते हैं।

बच्चे, बूढे़, महिला आरती मिल करते हैं
दांडिया का नृत्य मन मे उभार लाता हैं ।

ऐसा हैं पन्हाला यहाँ देवी के पंडाल मे जो
उत्साह हैं लिखने मे कवी थक जाता हैं ।।

पन्हाळ्यातील दुर्गा उत्सव

असा हा पन्हाळा
आनंदात न्हाला
महालक्ष्मी लावी
जनासी जिव्हाळा

असे रौशनाई
तिथे मंदिरात
फुले दांडिया अन
भजन मंडपात

मिळण्या प्रसाद
घाईत बच्चे,
देवीच घडवी
संस्कार सच्चे

ऐशा आईचा
जयघोष व्हावा
आनंद मनीचा
कधी न सरावा

Thursday, October 11, 2018

शेतकऱ्यांची कर्म कहाणी, मुखी राम अन डोळा पाणी

आपण सगळे दिवसामधून तीन वेळा जेवतो. आपली जेवणाची भाजी शेतकरी उगवतो, आणि ती भाजी सप्लायर्स ना विकतो. आपण भाजी आणायला गेल्यावर शेतकरी 10 रु. किलो बटाटे विकतो आणि तेच बटाटे सप्लायर्स 8 रु किलो ने विकत घेऊन 20 रु किलो ने विकतो. सप्लायर्स वीस रु किलोने मका विकत घेतात आणि आपण फिल्म पहायला गेल्यावर मूठभर मक्याचे पॉपकॉर्न 100 रुपयांना विकत घेतो.
आताचीच गोष्ट आहे, मी सुट्टीला घरी गेलो होतो, आमच्या मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण फार कमी आहे. आमच्याकडे पेरणी झाली  पण पाऊस नसल्याने पिके उगवलीच नाहीत. आमच्या सोयाबीनला या वर्षी 2200 रु प्रति क्विंटल दर होता. आणि मागच्या वर्षी 4200 रु एवढा भाव होता. आपण किराणा दुकानात गेल्यावर दुकानदार आपल्याला 15 लिटर सोया तेलाचा डबा रु 1400 मध्ये देतो.
एवढयावर माझे म्हणणे हे आहे की फक्त एवढेच करा, शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव द्या, त्याला योग्य तो न्याय मिळू द्या.
मध्येच कांदा 60 रु किलो होतो तर तोच पुन्हा 2 रु ते 3 रु किलो होतो. शेतकऱ्याने कांदा विकल्यावर त्याच्या गाडीचे भाडे देण्याएवढे पैसेपण त्याला मिळत नाहीत. मग अशा शेतकऱ्यांना मरणाशिवाय  दुसरा पर्याय दिसत नाही.

आज तुम्हे बतलाएं कहानी माता शेरांवाली की

आज तुम्हे बतलाएं कहानी
माता शेरांवाली की
बात पुराने सालों की
ये हम बच्चों मतवालोंकी

पडता था पंडाल यहां
अपनेही घर के आंगन मे,
माँ दुर्गा की पूजा की
लगती थी होड सुहागन मे

रहती थी माँ दुर्गा नौ दिन
मंगलमय माहौल बने,
मंगल आरती और दांडिया
मे हर कोई अनमोल बने

महिलाएं, जवाँ, वयस्क सब
माँ का मंगलगान कहे,
बच्चों की क्या कहने
बच्चे मेले मे खुशहाल रहे

उडनखटोला, गगन पालना
और मेरी गो राउंड मे,
बच्चे खेले, झूमे, नाचे,
मेले के कंपाउंड मे

माता के आशिर्वचसे सब
दुर्गुण की सीमा पार करें
ले-देकर मौलिक विचार
रावण का दहन इस बार करें

*********************

चला आज ऐकुया कहाणी
आपुल्या अंबामातेची,
बालपणी स्थापीत मनोमय
अष्टभुजा देवीची

अंगणी दुर्गा नऊ दिन वसते
मंडप सुंदर असतो,
नऊ दिन पूजा करीत सुवासिनी
हुरूप जरा ना विरतो

नऊ दिन शक्ती सानिध्याने
भक्तीमय आसमंत बने,
मंगल आरती आणि दांडिया
खेळमध्ये मनही रमे

महिला, तरुण, वयस्कर सारे
शक्तीरूपे तन्मय होती,
खेळ मिळे दसऱ्यात नवनवे
बालक आनंदुन जाती

घोडा-गाडि, आकाश पाळणा
आणि फुग्यांच्या मेळ्यात,
मुले किती खेळांत हरवती
दसऱ्याच्या त्या मेळ्यात

मातेच्या आशिर्वचनाने
सुविचारांचा स्वीकार हो,
दुर्गुण रुपी रावण जाळू
असेच सीमोल्लंघन हो

Wednesday, October 10, 2018

स्त्रीशक्ती चे अनन्य साधारण महत्व

माझ्या जीवनात ज्या स्त्रीशक्ती चे अनन्य साधारण महत्व आहे, त्या माझ्या आई पासून पत्नी आणि पुतणी, भाच्यांपासून मुली पर्यंतचा उल्लेख करून त्यांचे महत्व दर्शविण्याचा छोटासा हा माझा प्रयत्न -

कृष्णाई जैसी मूर्ती वात्सल्याची
मम माय जशी की साय क्षिराच्यावरची

विद्या-प्रतिभा अन् रूप चारुचे ऐसें
वर्षाव करीतसे पुष्प-सरोजे जैसें

हेमा नि चंदना बंधूगृही परिमळे,
दीपा नित संगे सहजीवनास उजळे,

आसावरी आणिक दुजी अंकिता ऐसी,
गायनी आणखी नर्तनी रमवी जनासी

अभिरुपा दुसरे रूप स्वरा चे जैसे,
संगीत सुखाला नित नित फुलवी ऐसें

©मंगेश पैंजणे
दि. ११/१०/२०१८

Sunday, October 7, 2018

We Media

रोज चार कविताएं लिखते चलो रे भाई,
वि मीडिया की बात समझ हमे आती है ।।

रोज लिखो रोज जीतो खेल ये सृजन का है,
लिखते रहो तो जिव्हा तेज बन जाती है ।।

खेल है अनोखा पर उतना नही आसान,
जितना सहज इसको समझ जाते है ।।

जिन पर असीम कृपा है माता शारदा की
वोही बंधू कविता सरल कर पाते है ।।

Saturday, October 6, 2018

अपनो से अब लडना होगा

शीलवंत से शीलभ्रांत हम
निकल पडे है होने को,
बुद्धी, भूमी खो चुके, अभी
सर्वस्व हमारा खोने को

अविचारी से व्यभिचारी
बनवाके हमको छोडेंगे,
एकपत्नीव्रत से हमको
पशुश्रेणी मे यह जोडेंगे

यवनोंसे लेकर अंग्रेजो
तक ले भागे हो पायेगा,
लूटा धन ज्ञान यहां से जो
वह क्या कर वापस आयेगा?

सच मे क्या हम अविकसित थे
कब तक यूँँ सहना होगा
धूल हटा मती की हमको
अपनो से अब लडना होगा

Wednesday, October 3, 2018

आज का शब्द है- कला!

कविता कला का ऐसा रूप है अनूप भाई,
सूर्य जो ना देखे वो कवीही देख पाता है ।

हो विवेक जिसका सजग औ सचेत ऐसा
आदमी सुबोध लेख लिखे चला जाता है ।

जिसकी नजर मे हो सुंदरता जमी हुई
चलचित्र अकूत बनाता चला जाता है ।

आती नही एक भी कला जिस मनुज को वो
सिंग पूछ विहीन पशूही कहलाता है ।।