वसने विभिन्न रंगांची ती
का करिते परिधान माऊली
आज पाहूया काव्यरूपातून
कशी प्रगटे जगदंब माऊली
का करिते परिधान माऊली
आज पाहूया काव्यरूपातून
कशी प्रगटे जगदंब माऊली
निळा रंग दे शांती मनाला
पिवळा उल्हासित चित्ताला
हिरवा करि समृद्ध जीवना
समरस करी जांभळा भवाला
पिवळा उल्हासित चित्ताला
हिरवा करि समृद्ध जीवना
समरस करी जांभळा भवाला
त्याग केशरी मनास शिकवी
शीत पांढरा शांती देई
लाल पाहता स्फुरण चढे ते
मोरपंखी आल्हादित सकला
शीत पांढरा शांती देई
लाल पाहता स्फुरण चढे ते
मोरपंखी आल्हादित सकला
रंग गुलाबी देई तरुणपण
कारज पूर्ण त्वरित करण्याला
अशी नवरूपे नवरंगातील
आशिष देती सदा भक्ताला
कारज पूर्ण त्वरित करण्याला
अशी नवरूपे नवरंगातील
आशिष देती सदा भक्ताला
©मंगेश पैंजणे
दि. 12 ऑक्टोबर 2018
सहकार्य :- रुपाली सूर्यवंशी, कोल्हापूर
दि. 12 ऑक्टोबर 2018
सहकार्य :- रुपाली सूर्यवंशी, कोल्हापूर
No comments:
Post a Comment