आली आली ग भवानी, आली तुळजाभवानी
सारे मुखाने गजर करू,
पूजा करून आईची, ओटी भरून खणाची,
चला उदो उदोकार करू ।।
सिंहवरी तू बैसून, अष्टआयुधे घेऊन,
दुष्टांचे निर्दालन, करी भक्तांचे रक्षण,
आली धावतची आली, करी कृपेची साऊली,
भक्तासाठी ही कल्पतरू
पूजा करून आईची, ओटी भरून खणाची,
चला उदो उदोकार करू ।।
राष्ट्राचे संरक्षण, करण्या झाली प्रसन्न,
शिवरायासी वरदान, दिली तलवार भवानीनं,
साधुसंतांना पावली, अशी माय माऊली,
चला भक्ती तिची करू
पूजा करून आईची, ओटी भरून खणाची,
चला उदो उदोकार करू ।।
रचना :- चारुशीला पैंजणे
No comments:
Post a Comment