आपण सगळे दिवसामधून तीन वेळा जेवतो. आपली जेवणाची भाजी शेतकरी उगवतो, आणि ती भाजी सप्लायर्स ना विकतो. आपण भाजी आणायला गेल्यावर शेतकरी 10 रु. किलो बटाटे विकतो आणि तेच बटाटे सप्लायर्स 8 रु किलो ने विकत घेऊन 20 रु किलो ने विकतो. सप्लायर्स वीस रु किलोने मका विकत घेतात आणि आपण फिल्म पहायला गेल्यावर मूठभर मक्याचे पॉपकॉर्न 100 रुपयांना विकत घेतो.
आताचीच गोष्ट आहे, मी सुट्टीला घरी गेलो होतो, आमच्या मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण फार कमी आहे. आमच्याकडे पेरणी झाली पण पाऊस नसल्याने पिके उगवलीच नाहीत. आमच्या सोयाबीनला या वर्षी 2200 रु प्रति क्विंटल दर होता. आणि मागच्या वर्षी 4200 रु एवढा भाव होता. आपण किराणा दुकानात गेल्यावर दुकानदार आपल्याला 15 लिटर सोया तेलाचा डबा रु 1400 मध्ये देतो.
एवढयावर माझे म्हणणे हे आहे की फक्त एवढेच करा, शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव द्या, त्याला योग्य तो न्याय मिळू द्या.
मध्येच कांदा 60 रु किलो होतो तर तोच पुन्हा 2 रु ते 3 रु किलो होतो. शेतकऱ्याने कांदा विकल्यावर त्याच्या गाडीचे भाडे देण्याएवढे पैसेपण त्याला मिळत नाहीत. मग अशा शेतकऱ्यांना मरणाशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

No comments:
Post a Comment