उद्याच्या स्वागत समारोहासाठी
नवनिर्मित स्वागतगीत
संजीवन स्नेहाने स्वागत करूया स्नेहभरे
स्वागतम सुस्वागतम सुस्वागत हर्षभरे
शुभ दिन जणू हा आज उदेला
सुजन आगमित शुभ्र प्रभेला
स्वागत करूया आज तयांचे जणू आनंदभरे
अर्जित करूया ज्ञानप्रकाशा
विलुप्त होवो सर्व निराशा
सुफळ साधना करुनी विदजन नभांगणी विचरे
2 ऑक्टोबर 2021
*©मंगेश पैंजणे*
संगीत शिक्षक
*संजीवन, पन्हाळा*