Friday, October 12, 2018

नवरूपे तू धारण करूनी भक्ता तोषविसी

आश्विनात नवरात्र पर्वणी घेऊनिया येसी
नवरूपे तू धारण करूनी भक्ता तोषविसी ।।
।। जय अंबे, जगदंबे ।।

आदिशक्ती तू अंबाबाई, महालक्ष्मी ती तुळजमाई,
पंढरीस राय रखुमाई, तूच खरी येमाई ।।
।। जय अंबे, जगदंबे ।।

तूच कालिका तूच रेणुका, तू सर्वांची देवी अंबिका,
तूच चण्डिका हिंगुलांबीका, तू सर्वांची आई ।।
।। जय अंबे, जगदंबे ।।

रचना :- चारुशीला पैंजणे
दि. 11 ऑक्टोबर 2018
पन्हाळा, कोल्हापूर

No comments:

Post a Comment