Tuesday, August 8, 2017

कविता :- ।। देशसेवार्थ जन्म ।।

।। देशसेवार्थ जन्म ।।

बहू दान केले, बहू ख्यात झाले,
कुबेरापरी द्रव्यही प्राप्त झाले,
जरी होय विस्मृत तू मायभूला
तुझा जन्म हा पूर्ण वायाच गेला.

करोनि अविश्रांत अभ्यास जेथे,
त्वया मेळवी ज्ञान हे श्रेष्ठ जेथे,
स्मरेना स्वभूमी ही क्षणमात्र ज्याला,
तुझा जन्म हा पूर्ण वायाच गेला,

करे जो सदा एक हाची विचार,
कसे फेडू माते तुझे उपकार,
सेवेस तुझिया मनी नित्य ज्वाला,
असा जन्म हा देशकामी निमाला

असा जन्म हा देशकामी निमाला

असा जन्म हा देशकामी निमाला

।। वंदे मातरम् ।।🚩🚩🚩

********************************

आमचा मित्रांच्या whatsapp ग्रुप वर, जन्मभूमी, कर्मभूमी या विषयावर थोडा संवाद झाला,
संजय टेकाळे, आकाश ढोकणे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या,
आणि मी या कवितेतून व्यक्त झालो

©मंगेश पैंजणे
कोल्हापूर
919422878769

दि. 7 ऑगस्ट 2017
वेळ सायं. 4:45

No comments:

Post a Comment