Thursday, September 21, 2017

अनुवाद - ।। नवदुर्गा वंदन ।।

मित्रानो,
वंदे मातरम्
आज नवरात्रोत्सवारंभ. घटस्थापनेचा आज चा पहिला दिवस.
सगळेच जण सोशल मीडिया वर एकमेकांना शुभेच्छा पाठवत होते,
मी पण एक श्लोक छान वाटला म्हणून Whatsapp मध्ये Brodcast केला.
माझे सहकारी कर्मचारी मित्रवर्य श्री सागर तांदळे यांनी तो श्लोक वाचला आणि मला रिप्लाय केला की वरील श्लोकाचा मराठी अनुवाद कर.
मी त्यांना हो बोललो आणि पुढील पलार्धात अनुवाद रूपाने माझे आजचे मराठी काव्य तयात झाले.
वाचकांच्या सुविधे करिता सोबत संस्कृत श्लोक सुद्धा देत आहे.
आजच्या स्फुरणाची प्रेरणा, आमच्या सागर तांदळे सरांना शतशः आभार.
मी पोस्ट केलेला श्लोक
ब्रम्होवाच -
प्रथमं शैलपुत्री च
द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति
कूष्माण्डेति चतुर्थकम्।।

पंचमं स्कन्दमातेति षष्ठं
कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति
महागौरीति चाष्टमम्।।

नवमं सिद्धिदात्री च
नवदुर्गा: प्रकीर्तिता:
उक्तान्येतानि नामानि
ब्रह्मणैव महात्मना:।।

माझ्याद्वारे अनुवाद
ब्रम्हदेव म्हणतात -

पहिली ती पार्वती देवी,
दूसरी ब्रम्हचारिणी ।।
तिसरी चंद्रघंटा ती,
कुष्माण्डा चवथी झणी ।।

पाचवी स्कंदमाता ती,
सहावी कात्यायनी असे ।।
सातवी काळरात्री ती,
महागौरी आठवी दिसे ।।

नववी सिद्धीदात्री ती,
नवदुर्गा प्रसिद्ध या ।
ब्रम्हा ने वर्णील्या साऱ्या,
सद्भावे नमुया तया ।।




"घटस्थापना"
दि.२१ सप्टेंबर २०१७
गुरुवार
प्रेरणा :- श्री सागर तांदळे
©मंगेश पैंजणे
९१९४२२८७८७६९
कोल्हापूर
संदर्भ -
http://googleweblight.com/i?u=http://www.harekrsna.de/artikel/nava-durga.htm&grqid=PWZYqQ9k&hl=en-IN

No comments:

Post a Comment