Sunday, December 24, 2017

सांताक्लॉज - एक विडंबन

क्रिसमस च्या पूर्वसंध्येला सुचलेली ही रचना.
जरूर वाचा.

चाल
सुप्रसिद्ध गीत - शांताबाई यावर आधारित.
(श्रीमान संजय लोंढे यांची विनम्रपणे माफी मागून)

आपणासमोर प्रस्तुत-

सांताक्लॉज, सांताक्लॉज,
सांताक्लॉज, अरे सांताक्लॉज

रूपाची वाण, दिसं भयाण,
लाखात भयाण, कम्बर कमान,
वाकडी मान, मारतो चकरा,
करितो नखरा,
इकडून तिकडं मारीतो चकरा,
चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा
सांताक्लॉज, सांताक्लॉज,
सांताक्लॉज, अरे सांताक्लॉज

तेरा ये जलवा,
येशूचा भुलवा,
लोकायचा कालवा,
जीवाला झुलवा,
पोरायले बोलवा,
समद्याले बोलवा
कालवा-हलवा, कालवा-हलवा, कालवा-हलवा"
सांताक्लॉज, सांताक्लॉज,
सांताक्लॉज, अरे सांताक्लॉज

अटक मटक म्हाताऱ्या भटक,
पांढरे फटक वाऱ्यानं उडती केस झटक
भटक-झटक, भटक-झटक,
भटक-झटक, भटक-झटक,
सांताक्लॉज, सांताक्लॉज,
सांताक्लॉज, अरे सांताक्लॉज

फिरून येतोय गरागरा,
गिफ्ट देतोया भराभरा,
हिरोच दिसतो जरा जरा,
म्हातारा आहे ह्यो खराखुरा
सांताक्लॉज, सांताक्लॉज,
सांताक्लॉज, अरे सांताक्लॉज


दि. 24 दिसम्बर 2017

रविवार

© मंगेश पैंजणे 

कोल्हापूर

9422878769


No comments:

Post a Comment